राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना 1911 मध्ये एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. प्रारंभी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युफाउंडलंड, न्युझिलंड,दक्षिण आफ्रिका व युनायटेड किंगडम हे देश सदस्य होते.1948 मध्ये एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशनचे राष्ट्रकुल संसदीय मंडळ असे नामकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय लंडन येथे स्थापन झाले. आजमितीस या मंडळात 175 शाखा आणि 17,000 पेक्षा अधिक संसद,विधानमंडळ सदस्य असून यात विकसित,अविकसित राष्ट्रे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 15 जुलै 1952 रोजी महाराष्ट्र शाखा स्थापनेचा प्रस्ताव सभागृहात मांडला.त्यानुसार 18 जुलै 1952 पासून या मंडळाची शाखा राज्यात कार्यरत झाली. 1964 पासून नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय कार्यप्रणाली व प्रथा या विषयांबाबत संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करते.
या वर्षी महाराष्ट्र शाखेचा 43 वा संसदीय अभ्यास वर्ग नागपूर हिवाळी अधिवेशनात होत असून या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्यांना जवळून ओळख करुन दिली जाते. या अभ्यासवर्गात वृत्तपत्रातील दिग्गज पत्रकार तसेच नामवंत संसदपटू व मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. सदस्यांसाठी 1965 पासून सभागृहातील कामकाजाची तोंडओळख प्रत्येक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर उजळणी अभ्यास वर्गाद्वारे केली जाते.
राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधिमंडळ सदस्यांसाठी खालील उपक्रमही राबविले जातात.
आंतरराष्ट्रीय परिषद : लंडन येथील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मुख्यालयाद्वारे तसेच आशिया विभागाच्यासीपीएयांच्यावतीने आयोजित केलेल्या परिसंवाद, परिषदा इ. उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील विधानमंडळातील सदस्यांना परदेशात पाठविले जाते.

पुरस्कार : विधानसभा व विधानपरिषदेतील सदस्यांनी विविध संसदीय आयुधांच्या माध्यमांतून लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामागिरीबद्दल त्यांचा गौरव लोकसभेच्या धर्तीवर उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण असे पुरस्कार देऊन मंडळामार्फत केला जातो.
परदेशी अभ्यासदौरे : अन्य प्रगत देशांनी शेती, माहिती व तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात केलेली प्रगती इत्यादींची माहिती घेण्यासाठी व विविध देशांच्या संसदीय प्रणालींचा अभ्यास,वैचारिक देवाण घेवाण करण्यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ,महाराष्ट्र शाखेतर्फे सदस्यांसाठी परदेश दौरेही आयोजित केले जातात.
महाराष्ट्र विधानमंडळाचा अमृत महोत्सव, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण, हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाने साजरेकेले आहे. सदस्यांच्या विचार प्रर्वतक भाषणांचा संकलन असणारा ग्रंथ ‘नोंदी’, आजीमाजी सदस्यांच्या आठवणींचा ‘स्मृतीग्रंथ’, वसंतराव नाईक यांच्या विविध भाषणांचे संकलन असणारा ‘चतुरस्त्र’ ग्रंथ महाराष्ट्र संसदीय मंडळ शाखेने प्रकाशित केला आहे. त्याचप्रमाणे मंडळ लोकशाही प्रणालीला बळकटी देण्यासाठी असे अनेकविध उपक्रम निरंतर राबवित आहे. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख हे सध्या महाराष्ट्र संसदीय मंडळाचे अध्यक्ष तर, विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे मंडळाचे पदसिद्धसह अध्यक्ष आहेत.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले असून अभ्यासवर्ग 18 डिसेंबर 2013 पर्यंत सुरू राहणार आहे.
शासन व्यवस्था राबविताना त्यावर जनतेचे प्रेम, विश्वास आणि आदर असणे गरजेचे असते. त्या व्यवस्थेची माहिती जशी सर्वसामान्य माणसाला आवश्यक असते त्याचप्रमाणे शासनकर्त्यांनाही आवश्यक असते. भारताने संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीची पाळेमुळे जनतेत अधिक घट्ट रूजावी, संसदीय शासन अधिक समृद्ध व बळकट व्हावे यासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ विविध उपक्रम राबवित आहे. संसदीय सदस्यांची कर्तव्ये, त्यांचे अधिकार आणि जबाबदारी यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात विविध विषयांवर विचारांची देवाण-घेवाण करणे या मंडळाचे कार्य असल्याने हे मंडळ म्हणजे लोकशाहीची पाठशाळाच आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.

- आकाश जगधने
(सहायक संचालक)