बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या छत्रपती संभाजी शॉपींग सेंटरचे लोकार्पण व पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप सोपल यांच्या नागरी सत्काराचे सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
    छत्रपती संभाजी शॉपींग सेंटरच्‍या बांधकामास सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला असून यामध्‍ये 24 गाळे व 7 हॉल उपलब्‍ध करण्‍यात आले आहेत. सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी कोल्‍हापूर येथील युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शॉपींग सेंटरचे लोकार्पण करण्‍यात येत आहे. यावेळी ना. दिलीप सोपल यांचा नागरी सत्‍कार व मानपत्र प्रदान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे राहणार असनू आ. दिपक आबा साळुंखे, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप माने, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, आर्यन शुगर्सचे चेअरमन योगेश सोपल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   

 
Top