नळदुर्ग -: येथील श्री दत्तकला विकास नाट्य मंडळाच्या वतीने रविवार दि. २२ डिसेंबर रोजी लोकमान्य वाचनालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता प्रधान ब्रम्हानंद शिंदे लिखित तीन अंकी नाटक “हा खेळ नशीबाचा” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे उदघाटन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी नगरराध्यक्षा सौ. अपर्णा अरविंद बेडगे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष शब्बीर सावकार, नगरसेवक शहबाज काझी, संजय बताले, अमृत पुदाले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड, नगरसेविका सौ. लक्ष्मी खारवे, वार्ताहार श्रीनिवास भोसले, शिवाजी नाईक, विलास येडगे, दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे, आंबादास वाघमारे, माजी नगरसेवक सुधीर हजारे आदीजण उपस्थितीत राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.