उस्मानाबाद -: येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला.यावेळी केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवांची समान उपलब्धता, शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्य समुदायातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा, गरिबांसाठी स्वयंरोजगार आणि मजुरी रोजगार, तंत्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यवृध्दी, आर्थिक कार्यासाठी कर्ज सहाय्यक, राज्य आणि केंद्रीय सेवांमध्ये भरती, ग्रामीण गृह योजनेत समान वाटा, अल्पसंख्याकाच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुधारणा, जातीय घटनांना आळा घालणे, जातीय गुन्ह्यातील खटले चालविणे, जातीय दंगलीत बळी पडलेल्यांचे पुनर्वसन या केंद्र शासनाच्या पंधरा कलमी अल्पसंख्याकाविषयीच्या योजना वाचून दाखविण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकाबाबत असलेल्या भरतीपूर्वप्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वउमेदवारांना मार्गदर्शन, शिक्षणाचा हक्क, शाळांना अनुदान, तसेच पोलिसांना सर्वजाती, धर्मसमान असून, सर्वांनी सामाजिक ऐक्यासाठी काम केले पाहिजे, याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, सहायक पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.वैशाली कडूकर, पोनि एम.डी.गुंडिले, पोनि गावंडे आदी अधिकारी तसेच शेख मसूद इस्माईल, अँड.शेख सलिम हानिफ, सय्यद शब्बीर अहमद, पृथ्वीराज चिलवंत, डॉ.र्जराकाझी, शयजोद्दीन शेख, अँड.विद्युलता दलभंजन, मिनहाज पठाण, मोईयोदीन पठाण, कादरखान पठाण, गुलमेहर पठाण, मुजमील काझी, आयाज शेख, अलिम शेख, मौनोद्दीन मणियार, असद पठाण, खालीद शेख, अँड.मोहंमद, एजाज काझी, मोहसीन शेख, अलीम शेख, जुल्फेकार काझी, खलीफा कुरेशी, अब्बास शेख आदी उपस्थित होते.प्रास्ताविक पोनि एम.डी.गुंडिले यांनी केले तर डॉ.कडूकर यांनी आभार मानले.