बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील अरूण सांगोळे यांच्या अध्यक्षतेखाली नाभिक महासंघाच्या झालेल्या बैठकीत नागेश दुधाळ यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
    यावेळी प्रदेशाध्यक्ष भगवान बिडवे, दत्ता अनारसे, पांडुरंग चौधरी, संपर्कप्रमुख सुहास गाडेकर, जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र देवकर, युवक शहराध्यक्ष महेश राऊत यांचीही निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.
    नागेश दुधाळ यांनी संतसेना महाराज पुण्‍यतिथी, धामणगावचे शहीद लालासाहेब वाघमारे पुण्‍यतिथी, विविध समाजोपयोगी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार, सामाजिक प्रश्‍नांची सोडवणूक, मेळाव्‍याचे आयोजन करुन विचारमंथन घडवले. कारी (ता. बार्शी) येथे समाजबांधवांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न केला आहे.
    यावेळी भालचंद्र ठोंबरे, शशिकांत निकम, हरिभाऊ ठोंबरे, अरुण गाडेकर, राजेंद्र गवळी, पांडू डाके, सुधीर राऊत, राजाभाऊ गायकवाड, मच्छिंद्र राऊत, दीपक वैद्य, प्रशांत राऊत, शिवाजी दुधाळ, पिंटू राऊत, दत्‍तात्रय पोफळे, गणेश सुरवसे, अशोक ठोंबरे, शिवाजी चौधरी, रोहन काळे, श्रीकांत चौधरी, जयराम वाघमारे, पिंटू दळवी, दशरथ राऊत, प्रशांत काळे, नागेश गवळी, भारत दुधाळ, दिपक दुधाळ, सचिन दुधाळ, नितीन दुधाळ, शिवाजी ठोंबरे आदी उपस्थित होते.
 
Top