सोलापूर -: मौजे माचणुर (ता. मंगळवेढा) येथील गावठाण मोजणी कामाचा शुभारंभ दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बाळासाहेब वानखेडे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, सोलापूर यांच्या शुभहस्ते व मौजे माचणूर गावचे सरपंच बालाजी राजाराम कुरवडे यांच्या अध्यक्षतेखाली व उप अधिक्षक भुमि अभिलेख माढा सिध्देश्वर घुले यांचे तसेच उपसरपंच विलास गुंडोपंत डोके, ग्रामसेवक बाबासो कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सदर गावठाण मोजणीमध्ये ग्रामस्थांच्या गावठाण हद्दीतील जमिनीची सविस्तर मोजणी होवून नकाशे (सनद) व मिळकतपत्रिका हे हक्काचे कागदपत्र तयार होणार आहेत.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असे आवाहन उप अधिक्षक भूमि अभिलेख, मंगळवेढा यांनी केले आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असे आवाहन उप अधिक्षक भूमि अभिलेख, मंगळवेढा यांनी केले आहे.