सोलापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्था ही सर्व सामान्य नागरिकांना धान्य व केरोसीन मिळण्यासाठी केलेली हक्काची यंत्रणा आहे. वेळोवळी अनेक शहरात या व्यवस्थेबद्दल तक्रारी प्राप्त होत असतात. सदर योजनेची अंमलबजावणी कशी होते याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत दिनांक १४ व १५ डिसेंबर या कालावधीत शहरातील सर्व रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासकीय प्रतिनिधीसमोर धान्याचे वाटप करण्यात आले या कालावधीत काही शिधापत्रिकाधारकांना धान्य उचलणे शक्य झाले नाही अशा नागरिकांनी या कार्यालयाच्या हेल्प लाईनकडे धान्य न मिळण्याबाबत संदेश पाठवून पुन्हा लवकर धान्य वाटप विनंती केलेली आहे. अशा सर्व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी अन्नधान्य व केरोसीनचे वाटप शासकीय प्रतिनिधींसमोर पुन्हा करण्यात येत आहे.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर दिवशी आपल्या रास्त भाव धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे व सार्वजनिक वितरण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे अशी विनंती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या योजनेबाबतच्या आपल्या सूचना व अडीअडचणीच्या सोडवणूकीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.