बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वीज कनेक्शनस् तोडू नयेत, या प्रश्नासाठी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी शिवसेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
राज्यशासन शेतक-यांकडे सहानुभूतीने बघत नाही. बार्शी तालुक्यातही गत दोन वर्षात शेतकरी दुष्काळाने होरपळलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीममुळे आणि भारनियमनामुळे मुळातच विद्युत पंपाचा वापर नव्हता, तरीही शेतक-यांना अन्यायकारक वीज बीले देण्यात आली. या वीज बिलाची सक्तीने वसुली सुरु आहे. थकबाकी न भरु शकणा-या शेतक-यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर ज्या शेतक-यांनी थकबाकी भरली आहे, त्यांचीही वीज कनेक्शनचा टान्सफॉर्मर एकच असल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. या प्रश्नासाठी शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बार्शी तहसिल कार्यालयापासून शेतकरी व शिवसैनिकांचा भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगेपाटील, उपप्रमुख तात्यासाहेब भँवर आदी करणार आहेत. हा मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरुन निदर्शने करत महावितरणच्या मुख्य कार्यालयावर आणला जाईल, यावेळी मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेत होईल.
या मोर्चात सर्व शेतकरी बांधव व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन बार्शी तालुक्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शहरप्रमुख दिपक आंधळकर, तालुकाप्रमुख काकासाहेब गायकवाड, वैराग उपप्रमुख संतोष गणेचारी, बाळासाहेब पवार, बाबासाहेब कापसे, राजेंद्र मिरगणे, माजी नगरसेवक नागजी नान्नजकर यांनी केले आहे.