उस्मानाबाद -: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ९७२ उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ठ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामार्फत शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये उत्तम प्रकारची मोफत वैद्यकिंय सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त पात्र रुग्णानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशेाक धाकतोडे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबांच्या दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधापत्रिधारक, अत्योंदय व अन्नपुर्णा योजनेचे लाभार्थी तसेच दारिद्रय रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारक या योजनेत समावेश आहे. त्यांची या शिबीरात मोफत तपासणी करुन निदान केले जाणार आहे.
या शिबीरात व्याधीवर वैद्यकिय उपचार केले जाणार आहे. मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रकिया, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), त्वचारोग, कृत्रिम अवयव, आणि इंटरव्हेशनल रेडिओलॉजी या व्याधीवर उपचार केले जातील.