उस्मानाबाद :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद आयोजित पुणे, नाशिक, औरंगाबाद जिल्हयातील खाजगी क्षेत्रातील उद्योजक / कंपनी यांच्याकडील विविध पदे भरण्यासाठी बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उस्मानाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पुरुष व महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश पवार, सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील पुरुष व महिला बेरोजगार उमेदवारांसाठी ३ उद्योजक ४३० पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून निवड प्रक्रिया करणार आहेत.
डेक्कन मॅनेजमेंट कन्सलन्टंन्स ,फिनिशिंग स्कुल, इंद्रायणी, पुणे अंतर्गत याझकी इंडिया लि. वाघोली ,पुणे यांचेतर्फे जॅाब ट्रेनी पदासाठी महिला व पुरुष ५० पदासाठी एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. किंवा आय. टी. आय. कोणताही ट्रेड उत्तीर्ण उमेदवार मुलाखती देऊ शकतील.
कल्याणी फोर्ज लि. कोरेगाव भिमा, ता. शिरुर, जि. पुणे यांचेतर्फे जॉब ट्रेनिची ५० पदासाठी १८ ते २५ या वयोगटातील एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. एमसीव्हीसी किंवा आय. टी. आय. फिटर व मशिनिष्ट इ. ट्रेड उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात येईल.
प्रेजिशिएन अटोमेंशन रोबोटीक्स इंडिया प्रा. कं. पुणे येथे जॉब ट्रेनिची ५० पदासाठी फक्त शासकीय आयटीआय फीटर, इलिक्ट्रीशियन ट्रेड उत्तीर्ण असावा.
एमपी ट्रेनिंग अॅकडमी लि., एमटीई सोयायटीज इंद्रावणे, पुणे अंतर्गत तापडीया लि. नाशिक हे ट्रेनीची ८० पदे १८ ते २६ वयोगटात भरणार आहेत. त्यासाठी एस. एस. सी. एच एस सी किंवा आय.टी. आयमधील कोणताही ट्रेड उत्तीर्ण, अशी पात्रता आहे.
अलिकॉन लि. पुणे यांचेकडे ट्रेनिची ५० पदासाठी एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. उत्तीर्ण उमेदवार पाहिजे आहेत.
मदरसन सुमी सिस्टीम लि. पुणे यांचेकडे ट्रेनिची ५० पदावर 18 ते 24 वयोगटातील फक्त महिला उमेदवारांची निवड केली जाईल. एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. उत्तीर्ण आय टी आय मधील कोणताही ट्रेड उत्तीर्ण असावा.
धुत ट्रॉन्समीशन प्रा. लि. एमआयडीसी शेंद्रा, जि. औरंगाबाद या कंपनीत ईपीपी ट्रेनिची १०० पदावर १८ ते ३० वयोगटातील पुरुष व महिलांची निवड करावयाची आहे. या पदासाठी एस. एस. सी. किंवा एच. एस. सी. उत्तीर्ण आय टी आय मधील कोणताही ट्रेड उत्तीर्ण असावा.
वरील पदासाठी पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारानी त्यांचे शैक्षणीक पात्रता, वय, अनुभव आदि मुळ प्रमाणपत्र व जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड ,पासपोर्ट आकाराचे फोटो ,स्वत:चा बायोडाटा आदि कागदपत्रांसह प्रतयक्ष मुलाखतीसाठी वरील तारखेस सकाळी साडे दहा वाजता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उस्मानाबाद येथे स्वखर्चाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.