बार्शी  : येथील युवा संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अबोली बहुउद्देशीय संस्थेतील एड्‌स बाधित विद्यार्थ्यांना शाल, स्वेटर, कानटोपी, खेळणी, तांदूळ इत्‍यादीचे वाटप करण्यात आले.
    रविवारी दि. १ डिसेंबर रोजी सावळे सभागृह येथे एडस् दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी करमाळा येथील गटविकास अधिकारी प्रमोद काळे, अबोलीचे अध्यक्षा आशाताई चांदणे, शेख, डॉ.रविंद्र जाधवर, वाहिद शेख, संस्थेचे अध्यक्ष अॅड. गणेश चव्हाण, अनिल देशपांडे आदीजण उपस्थित होते. प्रारंभी यशवंतराव सभागृहापासून जनजागृती फेरी काढण्यात आली.
    याप्रसगी काळे यांनी एडस विषयी माहिती सांगून जनजागृती होण्‍याची गरज व वस्‍तुस्थिती कथन केली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अॅड. घाणेगावकर, गणेश परंडकर, मुकेश रामगुडे, गणेश जगदाळे, अ‍ातिश पाटील, अभय चव्‍हाण, फारुख सय्यद, गणेश शिराळ यांनी विशेष परीश्रम घेतले.
 
Top