बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कारी (ता. बार्शी) येथे नूतन भाजपा शाखेचे उद्घाटन प्रदेश चिटणीस रोहन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विभागाचे संघटक अविनाश कोळी यांनी केले.
    याप्रसंगी बोलतांना रोहन देशङ्कुख म्हणाले, केंद्रातील कॉंगेसच्या भ्रष्ट व निष्क्रीय आघाडी सरकारला उलथून टाकण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. युवकांनी त्यादृष्टीने कामाला लागून जनतेचा विश्वास संपादन करावा.  मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असेही ते म्हणाले.
    यावेळी तालुका अध्यक्ष जयंत पाटील, शहराध्यक्ष दत्ता जाधवर, युवा मोर्चाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष सतिश सारंग, विलास शिंदे, आबासाहेब घाडगे, सूर्यकांत निंबाळकर, सुरेश घाडगे, अनिल बेताळे, शशिकांत स्वामी, अशोक पाचभाई, डॉ. विलास लाडे, प्रमोद पोकळे, भिमसेन अलाट, विष्णु ढेकळे, युवराज जगदाळे, उत्तम गोरवे, परमेश्वर बदाले, बाळासाहेब माळी, प्रताप पवार, अमोल डोळसे, परमेश्वर बदाले, स्वप्नील भुईभार, सुधाकर वाघमोडे, गणेश नाईकवाडी, तात्या घावटे, अरुण धंगेकर, दत्तात्रय निंबाळकर, महादेव तोगे, राजेश चव्हाण, समाधान डमरे, दिपक थिटे, विकास बारबोले, बाळासाहेब मांजरे, विठ्ठल उमाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top