सोलापूर -:  जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून युवक रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीस अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिनकर रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल भडकुंबे, न्या. श्री. गोखले व न्या. श्री. सोनटक्के यांनी ध्वज दाखवून सुरुवात झाली.
       महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिंध व नियंत्रण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी हॉस्पीटल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सामुहिकरित्या शपथ वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
 
Top