पांगरी (गणेश गोडसे) :- आपल्या फायद्यासाठी वाळुची चोरून वाहतुक करणा-या एकाला पांगरी पोलिसांनी वाळुसह अटक केल्याची घटना रविवार दि. 29 डिस्‍ेंबर रोजी दुपारी बार्शी ते कुसळंब मार्गावर घडली.
    दिलीप किसन पवार (वय, 32  रा.वाशी, जि.उस्मानाबाद) असे वाळु चोरून नेणा-या आरोपीचे नांव असुन त्याला अटक करण्‍यात आली आहे. अण्‍णाप्‍पा चंद्राम संगोळगी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवार रोजी कुसळंब दरम्यान एम एच 25 यु.111 या टिपरमधुन वाळुची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सापळा रचुन टिप्‍परची तपासणी केली असता त्यात विनापरवाना तिन ब्रास वाळुची वाहतुक करताना आढळुन आली. सखोल चौकशी केली असता आरोपी कदम हा स्वतःच्या फायद्याकरीता वाळुची चोरटी वाहतुक करत असताना आढळुन आला. स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीच्या उदेशाने वाळु विक्रीस नेऊन पर्यावरणाच्‍या -हासास कारणीभुत ठरल्याप्रकरणी पांगरी पोलिसात आज सोमवार रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top