पांगरी (गणेश गोडसे) :- पाठिमागील भांडणाचा राग मनात धरूण दोघांनी मिळुन एका वृदध महिलेला लोखंडी गजाने डोक्यात मारून गंभिर जखमी केल्याची घटना कांदलगांव (ता. बार्शी) येथे सायंकाळी सात वाजता घडली.
    श्रीमती चंद्रभागाबाई निवृत्ती भालेराव (वय 65, रा.कांदलगांव, ता. बार्शी) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृदधेचे नांव असुन प्रभु विश्‍वनाथ सरवदे व सोजराबाई सरवदे अशी लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
  जखमी चंद्रभागाबाई भालेराव या वृदधेने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, पाठिमागे झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून जखमी करत शिवीगाळ दमदाटी केली. चंद्रभागाबाईंनी दिलेल्या फिर्यादिवरून दोघांविरूदध मारहाण करूण जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top