पांगरी (गणेश गोडसे) :- किराणा दुकानाच्या उधारी देण्‍या-घेण्‍याच्या कारणावरून तिघांनी मिळुन दुकानदाराला दुकानाबाहेर ओढुन मारहाण करत रोख रक्‍कमेसह सोन्याचे दागिने हिसकावुन घेतल्याची घटना वालवड (ता. बार्शी) येथील चौकात घडली.
    बाळासाहेब परिचंद जाधवर (वय 30) व धनश्री जाधवर (वय 25, रा.वालवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या दुकानचालकाचे नांव आहे. अशोक संजीवन जाधवर अजय संजीवन जाधवर व नितीन संजीवन जाधवर अशी दुकानदारास काठी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
  जखमी बाळासाहेब परिचंद जाधवर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांचे वालवड येथे किराणा दुकान आहे.आरोपीने दुकानात किराणा माल उधारीवर मागितला होता.मात्र फिर्यादिने किराणा उधार देण्‍यास नकार दिले असता आरोपींनी संगनमत करूण फिर्यादिच्या दुकानी जावुन त्याला दुकानाबाहेर ओढुन काढत काठी व दगडांने बेदम मारहान करूण जखमी केले. तसेच रोख पाच हजार चारशे रूपये व त्यांच्या पत्नीच्या गळयातील दोन तोळयाचे मनीमंगळसुत्र हिसकावुन घेतले. शिविगाळ दमदाटी करत पती पत्नीला काठीने व दगडांने मारहान करून जखमी केले व जिवे ठार मारण्‍याची धमकी दिली. पांगरी पोलिसात तिघांविरूध्‍द मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top