उस्मानाबाद :- अनुसूचित जातीतील सुशिक्षत बेरोजगार युवती व महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने सुशिक्षित ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण  दि. 17 डिसेंबर 2013 ते 15 जानेवारी 2014 या कालावधीत  दुपारी 12 ते सायंकाळी 5 या आयोजित  करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक व अधिकाऱ्यांमार्फत  संपूर्ण ब्युटी पार्लर व उद्योजकीय अभ्यासक्रमाची माहिती दिली जाणार आहे.
       इच्छुक युवती- महिलांनी प्रवेश अर्जासाठी  व अधिक माहितीसाठी 15 डिसेंबरपर्यंत किरण बनसोडे- 8421484482 वर  संपर्क साधावा. तसेच 16 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष  मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र येथेही संपर्क साधावा, असे आवाहन (एम.सी.ई.डी.चे) कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद यांनी  केले आहे.
 
Top