उस्मानाबाद :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांतर्गत आरसीएच / पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत मुलगी वाचवा, देश वाचवा अभियानाची माहिती होवून सामाजिक मत परिवर्तन होण्यासाठी जिल्हा रुगणालयामार्फत जिल्हास्तरीय खुली निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना जिल्हा शक्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- भाग्यश्री लोंढे, व्दितीय- कांचन पडवळ तर तृतीय क्रमांक प्रमिला लकडे यांनी पटकाविला. कु. सोनाली शिवराय व कु. भाग्यश्री जावळे यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे देण्यात आली
वक्तृत्व स्पर्धेत- स्मिता जाधव, लोंढे भाग्यश्री, शेळके मयुरी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. तसेच अमोल राऊत व राम माने यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी निवासी वैद्यकिय अधिकारी (बास) डॉ. टी. एच माने, पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय खुने उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री. केारळी, श्रीमती गोरे, श्रीमती बेले, अॅड उमा गंगणे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक म्हणून श्रीमती सुनिता साळुंके, अमर सपकाळ, शेख सर्फराज यांनी काम पाहिले.