नागपूर -: अर्थसंकल्प सादर करताना समाज हित लक्षात घेऊन राज्याच्या आर्थिक क्षमतेनुसार निर्णय घ्यावे लागतात. यासाठी खर्च मर्यादित ठेवून राज्याचे उत्पन्न वाढले तर लोक हिताच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य होते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 43 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री.पाटील म्हणाले की, शासनाकडे जमा होणारा निधी आणि समाजासाठी खर्च करावयाचा निधी याबाबतचे वार्षिक वित्त विषयक विवरणपत्र किंवा अर्थसंकल्प वित्तमंत्री विधिमंडळाला सादर करतात. यामध्ये योजनेंतर्गत आणि योजनेतर खर्चासाठीच्या निधीचा समावेश असतो. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर मंजूर निधी त्या वर्षातच खर्च करणे आवश्यक असते. शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नात मूल्याधारित कर, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क यांचा महत्त्वाचा वाटा असून महसुली अधिक्याचा अर्थसंकल्प सादर करणारे महाराष्ट्र हे देशभरातील सर्वाधिक महसूल असलेल्या राज्यांपैकी एक असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास विभागांच्या विविध योजनांविषयी माहिती देताना श्री.पाटील म्हणाले, राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमध्ये संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे ग्रामपंचायत स्तरावरच 19 प्रकारचे दाखले दिले जातात. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये 19 ते 20 हजार ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून या माध्यमातून 9 कोटी 51 लाख झाडे लावली गेली आहेत. तीनही वर्षांचे निकष पूर्ण करणारी 4,100 गावे असून त्यांना शासनामार्फत 2 ते 12 लाखांपर्यंत अनुदान देण्यात आले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या योजनेचा मोठा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाच वर्गवारी करण्यात आल्या असून शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी देशात 13 व्या क्रमांकावर असणारा राज्याचा ग्रामविकास विभाग मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गात उद्या गुरूवार दिनांक 12 डिसेंबर रोजी ‘संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांचे स्थान आणि कर्तव्ये’ या विषयावर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांचे तर दुसऱ्या सत्रात ‘संवेदनशील शासन आणि गतिमान प्रशासन’ या विषयावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.