नागपूर -: क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी अनेक विश्वविक्रम करुन नाव लौकिक मिळविला. सचिनने यशाच्या शिखरावर पोहचूनही सामाजिक बांधिलकी जपली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार रोजी विधानपरिषदेत काढले.
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि शास्त्रज्ञ डॉ.सी.एन.आर.राव यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी मांडला, प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त करतांना ते बोलत होते.
श्री.पवार पुढे म्हणाले, सचिन तेंडूलकर यांनी 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मेहनत, जिद्द, चिकाटी व स्वकर्तृत्वाच्या जोरावर 24 वर्ष क्रिकेट विश्वात आपले वेगळ नाव केले. त्यांनी शतकांचे शतक करण्याचा विक्रम केला आहे. विक्रम आणि सचिन तेंडूलकर असे समीकरणच झाले होते. सचिन तेंडूलकर यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांना मोहिनी घातली, त्याचबरोबर भारताचे नाव जगभरात केले. 40 व्या वर्षी भारतरत्न मिळविणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे.
भारतरत्न मिळविणारे शास्त्रज्ञ डॉ.सी.एन.आर.राव यांनी रसायन शास्त्रात क्रांतीकारक संशोधन करुन भारताचे नाव जगभरात केले. त्यांनी लिहिलेले शोध निबंध आणि इतर लिखाण जगात स्वीकारले आहे. भारताच्या मंगळ मोहिमेचे ते एक शिल्पकार आहेत अशा शब्दात डॉ.सी.एन.आर.राव यांचा उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी गौरव केला. सचिन तेंडूलकर आणि डॉ.सी.एन.आर.राव या दोघांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सभापती शिवाजीराव देशमुख यावेळी म्हणाले, सचिन तेंडूलकर यांनी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. सचिन तेंडूलकर यांनी सर्व विक्रम आपल्या नावावर केले. त्यांच्यामधील सुसंस्कृतपणा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितो. त्याची कामगिरी पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त करुन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सचिन तेंडूलकर यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या दोघांचा अभिनंदन ठराव एकमताने मंजूर झाला.
डॉ.सी.एन.आर.राव यांनी भारताच्या मंगळ मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या रसायन शास्त्रातील कामगिरीचा गौरव केला आहे. त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सभापतींनी केले.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सदस्य दिवाकर रावते कपिल पाटील, हेमंत टकले, भाई जगताप यांनी अभिनंदनपर ठरावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.