नागपूर :- राज्यात शिधापत्रिका धारकांना संगणीकृत शिधापत्रिका देण्याबाबतचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या ६ महिन्यात संगणीकृत बारकोड शिधापत्रिका देण्यात येतील असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवा रोजी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
देशमुख पुढे म्हणाले, राज्यात अन्न सुरक्षा कायदा डिसेंबर-२०२३ अखेर राबविण्यात येणार असून या कायद्यांतर्गत केंद्र सरकारच्या योजनेत ८ कोटी ७७ लाख लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. जे लाभार्थी या कायद्यांतर्गत येणार नाहीत अशा
१ कोटी ७७ लाख लाभार्थ्यांना राज्य शासन ११०० कोटी रुपये खर्च करुन त्यांनाही सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन देणार आहे.
राज्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविली असता ५४ लाख ६ हजार ८८१ अपात्र शिधापत्रिका आढळल्या असून ज्या अपात्र शिधापत्रिका आढळल्या त्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे. बोगस शिधापत्रिका आणि अपात्र शिधापत्रिका यामध्ये फरक असून फक्त ३५ बोगस शिधापत्रिका आढळल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात बनावट रेशनकार्ड वितरीत केल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते विनोद तावडे तसेच दिपक सावंत, अॅड.आशिष शेलार आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.