नागपूर -: राज्यातील मागासवर्गीयांची विविध श्रेणी मधील रिक्त असलेली पदे भरण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील मागासवर्गीयांची सन २०१२ मध्ये २७ हजार पदे रिक्त होती. यातील निम्म्यापेक्षा अधिक पदे भरली आहेत. ही पदे भरण्यासंदर्भात सर्व अटी शिथील करण्यात आल्या असून मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली असून मार्च २०१४ पर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
    मागासवर्गीयांची राज्यातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य सर्वश्री सुभाष चव्हाण, भाई गिरकर, माणिकराव ठाकरे, रामनाथ मोते, भाई जगताप, आशिष शेलार आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
 
Top