नागपूर -: वीजदर कमी करण्यासंदर्भात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वीजदर कमी करण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासातसांगितले.
राज्यातील वीज चोरी व अल्प वसुलीमुळे महावितरणचे झालेले नुकसान याबाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधानसभा सदस्य सर्वश्री कालिदास कोळंबकर, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, गणपतराव देशमुख, प्रवीण दरेकर, नाना पटोले, अबु आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील भारनियमनाचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन वीज पुरवठ्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असूनराज्यातील सर्व जनतेने विजेचे मीटर वापरावे,त्यासाठी शासन मागेल त्यांना वीज मीटर पुरवठा करण्यास तयार आहे, असेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.