उस्‍मानाबाद -: ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्याखालील विभागीय सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयाच्या कामाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून दि.19 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार या कार्यालयाच्या नावात सद्यस्थितीतील शासकीय जिल्हा ग्रंथालय ऐवजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व ग्रंथपाल या पदनामाऐवजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी असा बदल करण्यात आला आहे. या कार्यालयास येथून पुढे जिल्हा  ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जलस्वराज्य हॉल, जुनी जिल्हा परिषद इमारत, उस्मानाबाद -413501 ( दुरध्वनी क्रमांक – 02472-226455) या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा,असे प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी ह.रा.डेंगळे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.       
 
Top