उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी/मार्च 2014 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गंत तसेच तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या होत्या. मात्र, काही कनिष्ठ महाविद्यालयांना आवेदनपत्र भरण्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे मंडळाच्या राज्य सचिवांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आनलाईन पद्धतीने विहित नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर करावयाची मुदत 13 डिसेंबरपर्यंत असून विलंब शुल्कासह दि. 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत आवेदनपत्रे भरता येतील. तसेच उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट कापी (हार्ड कापी) व चलनाच्या प्रतीसह मंडळाकडे सादर करावयाच्या तारखा नियमित शुल्कासह दि. 17 डिसेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह 21 डिसेंबर ही आहे.
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी www.mahahsscboard.maharashtra.gov.in आणि www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्रे भरावीत, असे स्पष्ट करण्यात आले