उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधीकरण आणि माता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था , उस्मानाबाद यांच्या वतीने नुकतेच मौजे गौडगाव (ता. उस्मानाबाद) येथे भ्रमण वाहनाद्वारे विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, बालक आणि मालमत्ता हस्तांतरण कायदा या विषयांवर हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आय. एम. नाईकवाडी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस.पी. राचकर, विधीज्ञ डी.पी. वडगावकर, रत्नमाला चौरे, मीना जाधव, विद्या साखरे, संस्थेचे अध्यक्ष मनीष वाघमारे कार्यक्रमास उपस्थित होते.
न्या. राचकर यांनी मालमत्ता हस्तांतरण कायदा विषयावर मार्गदर्शन केले. अड. जाधव यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती साखरे यांनी विधी सेवा प्राधिकरण कायदा विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गौडगावचे उपसरपंच बालाजी भोसले यांनी केले.