सोलापूर -: अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत अन्न व्यावसायिकांनी आपल्या अन्न व्यवसायाची परवाना/ नोंदणी करुन घेण्यासंदर्भात मंगळवेढा तालुक्यात दिनांक १५ डिसेंबर २०१३ रोजी न.प. वाचनालय मंगळवेढा येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमधील अन्न व्यावसायिकांच्या अन्न परवाना/ नोंदणीबाबत धारिका व शुल्क स्विकारुन अन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदर शिबीरात टी.सी. बोराळकर, सहाय्यक आयुक्त (अन्न), यांच्या मार्गदर्शनाखाली रा. मा भरकड, बा.औ. शिंदे, सु. पो. तोरेम व श्रीमती रे.र. पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहभाग घेतला. सदर शिबीरांतर्गत एकूण 139 अन्न व्यावसायिकांनी सहभाग नोंदवून त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आपल्या व्यवसायाची नोंद करुन घेतली.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या अन्न व्यवसायासाठी आवश्यक असणारा अन्न परवाना/ नोंदणी करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत योग्य ती कारवाई घेण्यात येईल असे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी कळविले आहे.