ताज्या घडामोडी

कळंब  (बालाजी जाधव) -: मोटारसायकल व राज्‍य परिवहन महामंडळाची एसटी बसच्‍या अपघातात मोटारसायकलस्‍वार जागीच ठार झाल्‍याची घटना  सोमवारी रात्री पावणे आठ वाजता कळंब शहरापासुन दोन किलोमीटर अंतरावर येरमाळा रोडवर घडली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद झाली नव्‍हती.
       घटनास्‍थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कैलास विष्‍णुपंत  खंदारे (वय 33 वर्षे, रा. भोपला, ता. केज, जि. बीड) हे मोटारसायकलवरुन (क्रमांक एमएच 44 एल 994) येरमाळ्याहून कळंबकडे जात असताना पर्याय संस्‍थेजवळ समोरुन पाथरी आगाराची परभणी-बार्शी ही बस (क्रमांक एमएच 20 बीएल 2316) मोटारसायकलस्‍वारास धडक देऊन झालेल्‍या अपघातात कैलास खंदारे हे जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्‍याच्‍या सुमारास घडला असून अपघाताची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एल. बाचके, पोलीस उपनिरीक्षक एम.एन. शेळके, हवालदार रमेश कदम, आगारप्रमुख रणखांब यांनी भेट दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता.
 
Top