उस्मानाबाद :- सर्व शासकीय विभागांनी त्यांना दिलेला विविध योजनांसाठी दिलेला निधी विहित कार्यपध्दतीप्रमाणे व विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चव्हाण यांनी विविध शासकीय यत्रंणाच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील खर्चाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे यांच्यासह बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे, कृषी व इतर यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, प्रत्येक शासकीय यंत्रणांनी त्यांचे नियोजन तयार केले पाहिजे. राज्यस्तरावरुन जिल्हास्तरासाठी निधी आणताना खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे निधी अखर्चित राहणार नाही. याची दक्षता घेतली पाहिजे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळण्याची कार्यवाही झाल्यानंतर विहीत मुदतीत निधी खर्च होणे अपेक्षित आहे. नागरीकांच्या हिताशी निगडीत असणाऱ्या योजनांची कामे ही गतीनेच झाली पाहिजे, असे त्यांनी सांगीतले.
यावेळी बैठकीस विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी त्यांना प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाबाबतची माहिती सादर केली.