उस्मानाबाद -: प्रत्येक गावाचा सर्वांगीण व पायाभूत विकास व्हावा म्हणून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम केंद्र व राज्य सरकार राबवित आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकासाच्या केल्या जाणा-या या कामाला लोकप्रतिनिधी आणि गावक-यांनीही हातभार लावला तर ग्रामविकास दूर नाही, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियानाचा समारोप आज पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डा. पद्मसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प.च्या विविध विषय समित्यांचे सभापती पंडीत जोकार, दगडू धावारे व सविता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, सन 2009 पासून केंद्र शासनाने हा कार्यक्रम आपल्या राज्यात सुरु केला आहे. पाणलोटांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र अधिकाधिक वाढण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त आहे. जिल्ह्यात ज्या गावात हा कार्यक्रम राबविला जात आहे, तेथील दृश्य परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन एकत्रितपणे हा कार्यक्रम राबविला पाहिजे. पाणलोट विकासासाठी हवा तेवढा निधी केंद्र व राज्य शासन देत आहे. त्यावरुनच शासन या कामाला किती महत्व देते, हे लक्षात येते. त्यामुळे पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अधिकाधिक चांगल्या प्रकारे राबविणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ शेतीच नव्हे तर शेतीवर आधारित इतर घटकांनाही स्वयंपूर्ण करण्याची तरतूद या कार्यक्रमात आहे. त्यामुळे गाव केंद्रबिंदू मानून पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून विकास करण्याचा हा कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
जनजागृती अभियानांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविलेल्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
खासदार डा. पाटील यांनीही पाणलोट क्षेत्र विकास महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. केंद्र सरकार त्यासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याने अधिकाधिक गावांचा समावेश करुन दर्जेदार कामे करण्याची सूचना त्यांनी केली. या जनजागृती अभियानाचा शुभारंभ दि. 26 रोजी खासदार डा. पाटील यांच्या हस्ते झाला होता.
जि.प.अध्यक्ष डा. व्हट्टे यांनी, पाणलोट जनजागृती अभियानात गावोगाव जाऊन याबाबतची माहिती पोहोचविण्याचे चांगले काम कृषी विभागाने केल्याचे सांगितले. प्रास्ताविकात तोटावार यांनी या जनजागृती अभियानात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची तसेच जिल्ह्यात सन 2009 पासून या कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांनी केले.