उस्मानाबाद :- विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र शासन, नवीन दिल्ली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने 18 ते 35 या वयोगटातील पदवीधर युवक- युवतींसाठी (ईडीपी) प्रशिक्षण दि. 11 डिसेंबर 2013 ते 12 जानेवारी 2014 या कालावधीत आयोजित  करण्यात आले आले. या प्रशिक्षणात उद्योजकता स्वत:मध्ये कशी रुजवावी, लघु उद्योग ते उत्पादनाबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग कांबळे क. प्रकल्प अधिकारी एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद यांनी दिली.
     या प्रशिक्षणात उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरी विषयी माहिती, कर्ज व अनुदान विषयक आदि विषयावर  यशस्वी उद्योजक व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. एसएसआय ,एमआयडीमधील भूखंड, आयएसआय ट्रेडमार्क, लागो, उद्योगाला लागणारे परवाना, उद्योग कसा व कोणता निवडावा, कच्चा मालाची माहिती, आकर्षक पॅकिंग, अन्न औषध भेसळ, धान्य प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन, औषधी वनस्पती, हरीतगृह, शेडनेट हाऊस, मिनरल वॉटर, कुलर, स्टोअरेल, वेअर हाऊस, स्टोन क्रेशर, प्रकल्प अहवाल तयार करणे, खरेदी विक्री चे तंत्र उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, नाबार्डचा कर्ज योजना, जिल्हा उद्योग व खादी ग्रामोद्यागाच्या विविध योजना आदि योजनेची माहिती दिली जाईल. इच्छुक युवक-युवतींनी अर्जासाठी  व अधिक माहितीसाठी  राजकुमार गायकवाड, कार्यक्रम समन्वयक -मो.9011219701 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.                                 
 
Top