उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी विक्रीकर निरीक्षक (पुर्व) पदाची लेखी परीक्षा सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. सदर परीक्षा असणा-या परीक्षा केंद्र परीसरात  प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
      उस्मानाबाद येथील (सर्व) रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पार्ट-ए , रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पार्ट-बी, श्रीपतराव भोसले हायस्कुल जुनी इमारत, श्रीपतराव ज्युनियर कॉलेज नवीन इमारत तिसरा मजला, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज नवीन इमारत पहिला मजला, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज नवीन इमारत दुसरा मजला, , आणि छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज, उस्मानाबाद.  या  सर्व  केंद्रावर ही  परीक्षा होत आहे. सदर परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी कळविले आहे.
      या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस. टी. डी. बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
     परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी , शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आवारात ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.                       
 
Top