उस्मानाबाद :- जिल्ह्यातील खासगी मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की, जिल्हा परिषदेने  दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांना  वैयक्तिक मान्यता देण्याकरीता दि. २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत येथील आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद येथे शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद  (माध्यमिक) विभागाचे शिक्षणधिकारी, उस्मानाबाद यानी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    यापूवी्र शिबीरात दाखल केलेले व त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित असलेले वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, विना अनुदानित व कायम विनाअनुदानित तत्वावर नियुक्त केलेले परंतु अद्याप मान्यतेकरीता प्रस्ताव सादर न केलेल्या कर्मचा-यांचे प्रस्ताव, यापूर्वी या कार्यालयाने रिक्त पद भरण्यास शासन मान्यतेने नाहरकत प्रमाणपत्र घेवून नेमणूक केलेल्या शिक्षकांचे मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय उपरोक्त कालावधीत  उस्मानाबाद येथे घेण्यात येणार असून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिबीर कालावधीतच सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   
 
Top