पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता.बार्शी) परिसरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असुन या हंगामातील थंडीमुळे अनेकांना हुडहुडी भरू लागली आहे. यावर्षी थंडी जरा जास्तच पडत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागात थंडीपासुन बचाव करण्यासाठी पहाटे व सायंकाळी शेकोटया पेटु लागल्या आहेत. सासु थोडेशे जळण आणल्याशिवाय शेकोटीजवळ आजही बसु न देण्याचा जुना खाटाटोप आजही जपला जात आहे. सासु आणली का असे विचारल्यानंतर आज पंच्याहत्तरी ओलांडलेला वृदधही आपल्या बालपनात व तारूण्यात पोचतो व बालपनीच्या कथा आठवणी सांगत शेक घेतात.
थंडीचा हंगाम जोरात सुरू झाल्यामुळे एरव्ही कधी घराबाहेर व चार माणसात न बसणारे घरातील अनेकजण शेकोटीच्या निमित्ताने का होईना घराबाहेर पडुन चार माणसात बसुन गप्पात भाग घेऊ लागले आहेत. त्यामुळे थंडीचा हंगाम व शेकोटया हया एकप्रकारे माणसांना जवळ आणण्यासाठी व हेवेदावे विसरण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू पहात आहेत. ग्रामीण भागात किरकोळ किरकोळ कारणावरून वेगवेगळया दिशेला झालेली तोंडे शेकोटीमुळे पुन्हा समोरासमोर येऊन त्यांच्या संभाषण सुरू होऊ लागले आहे. म्हणजे शेकोटया हया एकप्रकारे मने दुभंगलेल्यांना जवळ आणण्याचे प्रभावी साधन ठरत आहे.
थंडी अनेक पिकांना पोषक
सुरू असलेली थंडीची लाट व गारठलेले तापमान या भागातील अनेक पिकांना पोषक ठरत आहे. कांदा, गहू, हरभरा, ज्वारी आदी अनेक पिकांना थंडीच्या लाटेमुळे तरतरी आली असुन पिकांची वाढ जोमात सुरू आहे. त्यामुळे थंडी पिकांसाठी लाभदायक अशी ठरत आहे. बोच-या थंडीमुळे कांदा पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होऊन वजनात मोठी भर पडत आहे. शेतक-यांच्या उभ्या अनेक पिकांना थंडीचा खुपच मोठा लाभ होत आहे. कोरडवाहु जमीनींवरील ज्वारीची व गव्हाची पिकेही पडलेल्या थंडीच्या लाटेमुळे चांगलीच तग धरून असुन त्यांना टपटवी आल्याचे निदर्शनास येत आहे. कांही ठिकाणी ज्वारीची कोळपणी कामे शेतकरी उरकण्याच्या मार्गावर आहे. नव्याने ऊस लागवड केलेल्या शेतक-यांना मात्र थंडीमुळे उस उगवण होताना अडचण निर्माण होत आहे. पिकांना उष्णता निर्माण करणा-या खतांच्या मात्रा द्याव्या लागत आहेत.
द्राक्षबागांवर विपरीत परिणाम
वाढत्या थंडीचा या भागातील द्राक्षबागांवर मात्र विपरीत परिणाम घडत आहे. आधीच सलग तिन वर्षे पडलेल्या भिषण दुष्काळामुळे ऐंशी टक्के बागा फेल ठरल्या आहेत. त्यातच अलीकडील कांही दिवसात तापमानात खुपच घट झाल्यामुळे द्राक्षांच्या घडांवर भुरीसदृष्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत आहे. कांही दिवसांपुर्वी ढगाळ वातावरणामुळे व त्यावर उपचार करता करता अगोदरच मेटाकुटीला आलेल्या द्राक्ष ऊत्पादकाला थंडीमुळे पुन्हा अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. इतर पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी द्राक्षपिकांना मात्र कमी तापमानाचा फटका बसत आहे.
गतवर्षीची आठवण
गोठलेले तापमान व त्यामुळे होणारा त्रास यामुळे अनेकांना या वर्षीचा हिवाळा सहन करण्यापलीकडे जात आहे. यापुर्वी सलग पडलेल्या दुष्काळामुळे गतवर्षीच्या हंगामात नावालासुदधा थंडी जानवलेली नव्हती. त्यामुळे यावर्षीच्या तापमानामुळे अनेकांना गेल्या वर्षीचे वर्ष बरे होते असे वाटत आहे.