बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुक्यातील सुर्डी, दहिटणे, लाडोळे, रुई या चार ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी तहसिल कार्यालय येथे पार पडली व अंतीम निकाल जाहीर करण्यात आले. यातील दहिटणे, लाडोळे व रुई या ३ ग्रामपंचायतीमध्ये सोपल गटाने बाजी मारली तर राऊत गटाने सुर्डीची ग्रामपंचायत काबीज केली.
    या निवडणुका कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडल्या. ४ गावातील एकूण ३६ जागांसाठी या निवडणूका घेण्यात आल्या त्यापैकी १ जागा बिनविरोध तर उर्वरित ३५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. १३ केंद्रांतून मतदान प्रक्रिया पार पडली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सुर्डी : नितीन श्रीमंत भडकवाड, सुशिला अभिमन्यू कसबे, नवनाथ कृष्णा पवार, काशीनाथ भगवान शेळके, अनिल लक्ष्‍मण शेळके, दादासाहेब गोवर्धन डोईफोडे, त्रिवेणी बळीराम डोईफोडे, दहिटणे : शहाजी विठ्ठल ढोबळे, संगीता महादेव सुतार, साखरबाई नागनाथ काशीद, महादेव भिमराव ताटे, ज्ञानेश विष्णु काशीद, दिपाली बाळासाहेब काशीद, नारायण मनोहर काशीद, शामल हनुमंत जाधव, रुई : राजाभाऊ वामनराव घोडके, मनिषा आबा सुरवसे, जयश्री शाम लोखंडे, बुवासाहेब श्रीमंत घोडके, अश्विनी संजय ठोकळ, नागनाथ पांडूरंग माळी, अजित रंगनाथ भोसले, लतिका महादेव पावले, लाडोळे : अमोल रंगनाथ सागर, कलावती मधूकर गुंड, परमेश्वर अंकुश गुंड, सुवर्णा उमाकांत सागर, शर्मिला प्रकाश गुंड, नंदकुमार केरबा पाटील, ताई खंडू डोलारे.
 
Top