कळंब (बालाजी जाधव) -: शासकीय आधारभूत धान्य किंमत खरेदी योजनांतर्गत भरड धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन तहसिलदार शिंदे यांच्या हस्ते कळंब येथील शासकीय गोदामात करण्यात आले. जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.आर. पाटील, खामसवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, सचिव व्ही.जे. देशमाने, बाजार समितीचे केंद्रप्रमुख रमेश माळी, डी.व्ही. हजारे, तहसिल कार्यालयाचे अधिक्षक एन.डी. पवार, गोदामपाल समीर पठाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी चेअरमन संजय पाटील यांनी शेतक-यांनी एफ.ए.क्यू. दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा, हॅब्रीड ज्वारी दीड हजार रुपये व मका 1300 रुपये या आधारभूत किंमतीने खरेदी करण्यात येईल. शेतक-यांनी जास्तीत जास्त शेतमाल विक्रीसाठी आणून आधारभूत किंमती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.