पांगरी (गणेश गोडसे) :- (घोळवेवाडी) ता. बार्शी येथे दत्त जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली.
बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षीही दत्त जन्मोत्सवानिमित्त दि. 11 डिसेंबर पासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जंयंतीनिमित्त रात्री देविदास जाधव (सोलापुर), रामदास कदम (भानसगांव), विलास कोल्हे (तुळजापुर) यांच्या भारूडाचा कार्यक्रम व नंतर भोर्इटे महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. नंतर पहाटे पाच वाजता काकडा आरती पार पडली. त्यानंतर महापुजा पार पडली. सोमवारी दुपारी दत्तजन्माचे किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. तत्पुर्वी टाळ मृदंगाच्या निनादात गांवातुन दत्त पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान गुलाल फुलांची वृष्टी करून दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री दत्त जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
घोळवेवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त गावातील इतरत्र विखुरले गेलेले नौकरदार, उद्योजक या दिवशी एकत्रित येतात. गावाच्या दृष्टीने हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम एक आगळा वेगळा दिवस म्हणुन साजरा केला जातो. पांगरी, पांढरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, उक्कडगांव, येडशी, ममदापुर, गोरमाळे, कारी आदी अनेक गावांमधील भाविक उपस्थित होते. श्री दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बाबा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.