कळंब (बालाजी जाधव) : महाराष्‍ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेच्‍या मराठवाडा प्रदेश सचिवपदी सय्यद इलियाज आरेफ यांची निवड करण्‍यात आली आहे. त्‍यांचे सामाजिक कार्य व समाजाविषयक कार्याची धडपड पाहून ही निवड करण्‍यात आली आहे. पोलीस व नागरीक यांच्‍यात समन्‍वय निर्माण करण्‍यासाठी तसेच समाजात कायदा व सुव्‍यवस्‍था निर्माण करण्‍यासाठी त्‍यांनी नेहमीच प्रयत्‍न केले आहेत. म्‍हणून महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष कमलाकर कोकीळ यांच्‍या हस्‍ते नियुक्‍तीचे पत्र देऊन त्‍यांची निवड करण्‍यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्‍यक्ष कमलाकर कोकीळ, संस्‍थापक सचिव संतोष बोराडे, कळंब शहराध्‍यक्ष गणेश शेवते, प्रशांत मडके, तालुकाध्‍यक्ष अशोक क्षिरसागर यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top