अशोक घावटे
पांगरी (गणेश गोडसे) -: मनात आकाशात उडण्‍याची आकांक्षा असल्यास पंखात बळ नसतानाही पिल्ली ज्याप्रकारे अवकाशात उंचच उंच भरारी घेतात व आपले कतृत्व सिध्‍द करूण दाखवतात व पुन्हा मागे वळुनच पहात नाहीत याचाच प्रत्यय पांढरी (ता.बार्शी) या छोटया गावातील एका ध्येयवेडया गुराख्या सालगडी पोराकडे व सध्याच्या निर्मिता दिर्गदर्शकाकडे पाहिल्यावर येतो. माणसाकडे जिद्द, चिकाटी असल्यास व त्याला प्रयत्नांची जोड दिल्यास काय घडु शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पांढरीचे मुळ रहिवाशी व पुण्यासारख्या माणसांच्या जंगलात आपली वेगळी ओळख तयार करूण निर्मिता व दिग्दर्शक म्हणुन नावारूपाला आलेले अशोक बिभिषण घावटे होय.
    सध्या छोटया मोठया पडदयावर गाजत असलेल्या अनेक मालिका, नाटके, चित्रपट यांच्या कामात आपल्या कार्याची छाप घावटे यांनी पाडली आहे. निर्माता-दिग्दर्शक म्हणजे उच्चशिक्षीत पांढारपेक्षा समाजातील उच्चवर्गिय अशी समाजात तयार झालेली प्रतिमा पुसण्‍याचे काम त्यांनी केले आहे.
  घरची आर्थिक परिस्थती अत्यंत हलाकीची असल्यामुळे व पोटाची खळगी भरण्‍याचीही परिस्थती नसल्यामुळे नववीतच शिक्षणाला रामराम करून पोटासाठी मोलमजुरी करून गावात सालगडी म्हणुन काम करत अनेकांची जनावर राखत गुराख्याचेही काम करत आयुष्य पुढे सरकत असताना कांहीतरी करण्याची उमेद मनात सलत होती. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षांपर्यंत पांढरी गावात राहिल्यानंतर व गावातील निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या भांडणातुन अपघाताने गाव सोडण्‍याची वेळ त्यांच्यावर आली व घावटे यांनी पुण्यात जावुन जगण्‍यासाठी भाकरी शोधण्‍याचा प्रयत्न केला. पुण्यात गेल्यानंतर अस्मीतरंग या नावाने संस्थेची स्थापना करून या मार्फत कामाला सुरूवात केली. तेथुन पुन्हा निर्मिती क्षेत्राकडे अलगदपणे वळले. पुणे तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे तेथे गेल्यानंतर व परिस्थतीची जाणीव करून दिल्यानंतर अनेकांनी घावटे यांचे गुण ओळखुन व कला हेरून त्यांना मदतीचा हात देऊन उभे राहण्‍यास मदत केली.
    सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करत व परिस्थतीवर मात करत धडपड करत यश पादाक्रांत करण्‍याचा प्रयत्न केला. नंतर पुण्यातील स्थानिकांनी उचलुन धरल्यामुळे व मान्यवरांनी तुमच्यात कला आहे तुम्ही कांहीतरी करू शकता, त्यासाठी मनापासुन प्रयत्न करा, असे डोस दिल्यामुळे त्यांनी जिद्दीने पुढचा प्रवास चालु ठेवला व सध्या त्यांचे नांव नावाजलेल्या निर्मिता दिगदर्शकांच्या यादीत जावुन बसले आहेत. अकरा वर्षांचा खडतर प्रवास करून घावटे हे पुण्यातील एक नामांकित प्रस्थ म्हणुन पुढे आले आहेत. सिंधताई सपकाळ यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुलांने कांहीतरी बना असा उपदेश केल्यामुळे त्यातुन प्रेरणा घेऊन पुढे जाण्‍याचा प्रयत्न केला व आपले अस्तीत्व आपणच निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला.
   चित्रपट निर्मिती टेलिव्हीजन सिरीयल, व्‍यावसायीक नाटके, जनजागृती, स्त्रीभृणहत्या या विषयावरही त्यांचा जास्त भर असुन त्यांचे 'क्या फुल है हम' हे व्यावसायीक नाटक सध्या महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. निर्मिती व दिग्दर्शनावरच न थांबता त्यांनी विविध सामाजीक संघटनांमध्ये आपल्या कार्याची चुनुक दाखवली असुन ते सध्या अण्णा हजारे प्रणित भ्रष्‍टाचार समितीचे पुणे जिल्हा सचिव तसेच श्री साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष, अस्मीतरंग संस्था आदी विविध ठिकाणी काम करत आहेत. तसेच त्यांनी आर्थिक परिस्थतीमुळे शिक्षण प्रवाहातुन दुर फेकल्या जाणा-या कांही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांच्या शिक्षणाचा संपुर्ण आर्थिक भार उचलेला आहे.
 
Top