उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या उमरगा आगारातून उमरगा-भिवंडी या नवीन बससेवेचा शुभारंभ स्‍थानकप्रमुख एस.सी. कोष्‍टी व पत्रकार संघाचे अध्‍यक्ष लक्ष्‍मण पवार यांच्‍या हस्‍ते नुकतेच करण्‍यात आले.
    यावेळी वाहतूक नियंत्रक वाय.ए. पाटील, जे.एन. पवार, चालक गोविंद गायकवाड, वाहक एस.एन. माळी, मनसे आगार अध्‍यक्ष जिलानी शहा, के.ए. सिध्‍दीकी, बंदीछोडे, पारथे, परसकल्‍ले, संतोष माळी, पत्रकार महेबुब पठाण, विठ्ठल चिकुंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top