उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- शहरातील दिशा कोचिंग क्‍लासेस व टीईटी मार्गदर्शन केंद्राचा समारोप रविवार दि. 8 डिसेंबर रोजी संपन्‍न झाला.
    यावेळी प्राचार्य डॉ. एस.टी. गायकवाड, माजी शिक्षण विस्‍ताराधिकारी निवृत्‍ती सुरवसे, नगरसेवक बालाजी सुरवसे, राजेंद्र सुरवसे, प्राचार्य भिमाशंकर सारणे, प्राचार्य विकास गायकवाड, प्रा. विजयकुमार सरपे, प्रा. एस.डी. कांबळे, प्रा. सौ.प्रियंका गायकवाड, प्रा. शिल्‍पा कुलकर्णी, आशिष राठोड, सुरेश कोराळे, विकास सुर्यवंशी, चंद्रकांत सर्जे, सुजाता बोयणे, पुजा सरपे, अमोल हजारे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन केंद्रातील विद्याथी, मान्‍यवरांनी आपले मनोगते व्‍यक्‍त केले. समारोप कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन कांबळे यांनी तर प्रास्‍ताविक विजयकुमार सरपे यांनी केले. प्रा. शिल्‍पा कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.  
 
Top