उस्मानाबाद -: कुंथलगिरी दिगंबर जैन सिध्दक्षेत्राच्या इतिहासामध्ये शंभर वर्षात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमास जैन श्रावकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र कुंथलगिरी संचलित श्री देशभूषण कुलभूषण दिगंबर जैन ब्रम्हचार्यश्रमाच्या शताब्दी महोत्सव व महामस्तकाभिषेक निमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ क्षेत्राचे अध्यक्ष सुभाष गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाहुबली शहा, सतिश गांधी, रणजित दुरुगकर, यु.आर. शहा यांची उपस्थिती होती.
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र कुंथलगिरी येथील मुख्य मंदिरावरील शिखराचा जिर्णोध्दार करण्यात आला. त्याचबरोबर भगवान बाहुबली व भगवान मुनीसुवृत्तनाथ मानस्तंभ यांचा बारा वर्षातून महामस्तकाभिषेक होत असतो. या सर्वांचे औचित्य साधून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीचा कार्यक्रम घेण्यात आला. कुंथलगिरी दिगंबर जैन सिध्दक्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा आनंद हजारो जैन श्रावक-श्राविकांनी घेतला.