बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित, बधिर मुक विद्यालय आणि संघवी क्वालीटी प्रॉडक्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर वधू-वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बधिरमुक विद्यालयाचे अध्यक्ष विनय संघवी यांनी दिली. यावेळी अजित कुंकूलोळ, सुभाष जवळेकर, प्रा.दिलीप कराड, प्रा.राजकुमार मांगलकर, विजयकुमार दळवी आदी उपस्थित होते. रविवारी दि. १५ डिसेंबर रोजी कांदलगाव रोडवरील विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होत असून पालकमत्री ना.दिलीप सोपल यांच्या हस्ते, अध्यक्ष विनय संघवी यांच्या अध्यक्षतेखाली, नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, डॉ.बी.वाय.यादव, डॉ.काका सामनगावकर यांच्या उपस्थितीत होत आहे.
रविवारी बार्शीत कर्णबधिरांचा वधू-वर मेळावा