बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली असून सर्वसामान्य माणूस होरपळला जात असल्याने सदरची अन्यायकारक वीज बील वाढ रद्द करावी अशी मागणी येथील अन्याय विरोधी आंदोलन संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी महावितरणकडे केली आहे.
     पूर्वी असलेल्या प्रतियुनिट रु. २ पैसे २५ ऐवजी ऑगस्ट २०१३ पासून रु.३ पैसे ३५ प्रतियुनिट अशी वीज बील वाढ करण्यात आली आहे. १०० युनिटच्या पुढील वीज वापरणारांना तीन पटीने वाढ करण्यात येते. आमचा समाज हा झोपडपट्टीतील रहिवास करणारा असून महागाईङ्कुळे नागरिकांना वीज बिल भरणे तसेच भरमसाठ वाढ केल्याने ते भरणे अशक्य होत असून वीज जोडणी तोडण्यात येत आहे. मागासवर्गीय लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे कारस्थान होत असून याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल असेही म्हटले आहे.
 
Top