पांगरी (गणेश गोडसे) : पांगरी (ता. बार्शी) गावचा विद्युत पुरवठा त्वरीत स्वतंत्र फिडरवरून करावा अन्यथा विविध प्रकारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पांगरी ग्रांमपंचायतीने दिला आहे.
पांगरी गावास सध्या येथीलच विज उपकेंद्रातुन विज पुरवठा केला जातो. मात्र याच फिडरवरूण उक्कडगांव, पांढरी, चिंचोली, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी आदी गावांना विज पुरवठा केला जातो. मात्र या गावांना विज पुरवठा करताना अनेक शेतीपंपाना सहज विज उपलब्ध होते. तसेच इतर पाच गावचा विद्युत पुरवठाही याच फिडरवरून असल्यामुळे या गांवांमध्ये होणारी विज चोरी व गळती ही पांगरी गावाच्या माथी मारली जाते. इतर गांवात होणारी विज चोरी व गळती पांगरीकरांच्या डोक्यावर वितरण कंपनीकडुन टाकली जाते. त्यामुळे पांगरी गावची विज गळती, चोरी जास्त झाल्याचे वितरण कंपनीच्या रेकॉर्डवर येते. परिणामी पाच गांवात आकडयादवारे होणारी विजचोरी पांगरीतील विज ग्राहकांच्या बिलावर लादले जाते. त्यामुळे विजचोराचा आर्थिक भुर्दड सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो. पांगरी येथे पोलिस ठाणे, ग्रामिण रूग्णालय, पशुवैद्यकिय दवाखाना, कृषी कार्यालय विविध, बँका, पोष्ट कार्यालय यासह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे दैनंदीन कामकाज करताना अधिकारी व कर्मचा-यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पांगरीच्या नावावर विजचोरीचा वाढता आलेख असल्यामुळे पांगरी फिडरची श्रेणी खालावली आहे. परिणामी नियमित विजभरणा करून व कमी थकबाकी असलेल्या पांगरी ग्रामस्थांवर विज भारनियमनाचा सामना करावा लागतो. नियमित पैसै भरूनही विज ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागतो. तरी विदयुत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष केंद्रित करूण पांगरी गावातील विज ग्राहकांसाठी स्वतंत्र यंत्रनेदवारे विज पुरवठा करावा अन्यथा रास्ता रोको, उपोषण यासह पांगरी विज केंद्रास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा पांगरी ग्रामपंचायतीने दिला आहे.