उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- आज देशाला कॉंग्रेस पक्षाच्‍या विचाराची मोठी गरज आहे. आजच्‍या तरुण वर्गाला भुलवण्‍यासाठी अनेक त-हेचे प्रयत्‍न चालू आहेत. राहुल गांधी यांच्‍या विचारावर श्रध्‍दा ठेवून आजच्‍या तरुणांनी कॉंग्रेसला सहकार्य करावे, असे आवाहन युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी सुंदरवाडी (ता. उमरगा) येथे केले.
    उमरगा तालुक्‍यातील सुंदरवाडी येथे शनिवार रोजी शरण बसवराज पाटील युवा मंचची स्‍थापना करण्‍यात आली. त्‍याप्रसंगी शरण पाटील प्रमुख वक्‍ते म्‍हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सुंदरवाडीचे माजी सरपंच प्रभाकराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्‍या सभापती अक्षरताई सोनवणे, उपसभापती बाबा काझी, विजयकुमार सोनवणे, जि.प. सदस्‍य दिलीप भालेराव, नानाराव भोसले, संजय सरवदे, पं.स. सदस्‍य धनराज टिकंबरे, गिरीष बिराजदार, भुसणीचे सरपंच होणाजी, सचिन कांबळे, भालचंद्र लोखंडे, जिल्‍हा सरचिटणीस युवक कॉंग्रेस प्रा. सौ. जयश्री जाधव, अॅड. हेडे आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्‍येनी हजर होते.
    पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, आजचा युवक हा खरा देशाचा आधारस्‍तंभ आहे. त्‍यामुळे आपली शक्‍ती व विचार आपण आपल्‍या तालुक्‍यासाठी, जिल्‍ह्यासाठी कामी आणली तर खरा विकास काय असतो हे जनतेला, समाजाला कळेल.
    यावेळी बोलताना विजयकुमार सोनवणे म्‍हणाले की, किल्‍लारी येथील बंद पडलेला कारखाना चालू करुन परिसरातील बेरोजगा-यांना न्‍याय देण्‍याचे काम आ. बसवराज पाटील यांनी केले आहे. त्‍यामुळे त्‍यांचे हात बळकट करण्‍यासाठी आजच्‍या तरुण पिढीने कॉंग्रेस नेत्‍यांच्‍या विचारांना बळकटी द्यावी.   
    याप्रसंगी भालचंद्र लोखंडे, संजय सरवदे, दिलीप भालेराव, अॅड. हेडे यांनीही आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी शरण पाटील युवा मंचचे अध्‍यक्ष दिपक पाटील, उपाध्‍यक्ष बालाजी कुंभार, सचिव किशोर हिंडोळे, युसुफ मुल्‍ला, प्रदीप पाटील, लक्ष्‍मण घुले, प्रदीप कांबळे, किशोर जाधव, महेश मोरे, सुधीर सुसलादे, बिरु कटारे आदींनी प्रयत्‍न केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महम्‍मद मुल्‍ला यांनी केले तर सुत्रसंचालन विवेक जाधव यांनी केले. तर प्रा.सौ. जयश्री जाधव यांनी आभार मानले.
 
Top