सोलापूर :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगासर मार्गदर्शन केंद्र, सोलापूर मार्फत रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या https://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनेसाठी उपलब्ध असलेल्या, तिमाही विवरणपत्र ईआर 1 व द्विवार्षिक ईआर 2 आणि रिक्तपदाची भरती करताना पात्र उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेणे या सोई सुविधाबाबत तसेच या संकेतस्थळाबाबत आयोजित प्रशिक्षणास उपस्थित राहता आले नाही किंवा ज्या आस्थापनांना या संकेतस्थळावरील सुविधांची माहिती घ्यावयाची आहे, त्यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, सोलापूर येथे माहे डिसेंबर 2013 व जानेवारी 2014 महिन्यात प्रत्येक मंगळवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत संकेतस्थळावरील सेवा सुविधाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. तरी संबंधित आस्थापनांनी प्रत्येक मंगळवारी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे र.म.हुमनाबादकर, सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी आवाहन केले आहे.
 
Top