उस्मानाबाद -: कुंथलगिरी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्राचा रथयात्रा महोत्सव दि. 16 ते दि. 18 डिसेंबर या कालावधीत साजरा होत असून रथयात्रा महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता मुख्य मंदिरात पुजा व अभिषेक, सकाळी अकरा वाजता गुलाबचंद रावजी शहा (डोरलेवाडी), सौ. इंदिरा व शांतीनाथ दोडप्पा नाईक, डॉ. सुरेश व डॉ. रमेश (सांगली) यांच्यातर्फे महाप्रसाद, दुपारी दोन वाजता सर्व मंदिरावर ध्वजारोहण, रात्री आठ वाजता देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंथलगिरी येथील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पुजा व अभिषेक, अकरा वाजता धोंडीबा बाबुराव अन्नदाते यांच्या तर्फे महाप्रसाद, दुपारी दोन वाजता रथयात्रा महोत्सव तर दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पुजा व अभिषेक, अकरा वाजता दुरुगकर बंधू उस्मानाबाद यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिध्दक्षेत्रचे अध्यक्ष अरविंद जोशी, मंत्री वालचंद संघवी, उपाध्यक्ष सुभाष गांधी यांनी केले आहे.