बार्शी -: मॅसेफर्ग्युसन या नामांकित ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे अधिकृत विक्रेते पदमजा ट्रॅक्टर्स यांच्या वतीने दसरा दिवाळी दरम्यान आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेचे वितरण करण्यात आले.
शेतकर्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ही लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली. भू, परंडा, कुर्डूवाडी, माढा आणि बार्शी परिसरातील शेतकर्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. विश्वेश्वर बँक बार्शी शाखेचे शाखाधिकारी अनिल खजानदार यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात आले. पांगरी येथील मंगेश कारंडे, वाणेवाडी येथील महादेव यादव या दोन पारितोषिक विजेत्यांना महाराजा खुर्चीवर बसवून बक्षीसाची रु.५१ हजार रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. इतर दहा शेतकर्यांनाही प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. यावेळी पदमजा ट्रॅक्टर्सचे सचिन बारबोले, अमोल बारबोले, बबन गायकवाड, सुनिल माळी, आनंद निर्फळ, अविनाश कांबळे, समाधान नलावडे, डी.एन.गायकवाड, प्रितम नांदवटे आदी उपस्थित होते.