वाशी : जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशी तालुक्यातील पारगाव येथे छापा मारून कल्याण नावाचा मटका व जुगार खेळणार्या अकरा जणांना गजाआड केले. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पारगाव (ता. वाशी) येथे बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या गाळ्यासमोर चालू असलेल्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक मारूती शेळके यांच्या पथकाने छापा टाकला.यावेळी नितीन दत्ता ताटे हा सोरट नावाचा जुगार खेळवत असताना आढळून आला तर चाँद दादामियॉ पठाण, समाधान मोहन मोटे, बारिकराव भानुदास माने, बप्पा फैजल काळे, बालाजी नवनाथ घाडगे, अमर अशोक मोटे, राजू उत्तम कोकणे, ज्योतिबा रामचंद्र शिंदे व सुनील बप्पा काळे हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख ५ हजार ४८५ रूपये जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच मोहम्मद बाशू पठाण (रा. पारगाव) हा जिल्हा परिषद शाळेजवळ कल्याण नावाचा मटका घेत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करीत गुन्हा नोंदविण्यात आला.